Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

विवाहित महिलेचा विनयभंग ..

किराणा व्यापारीविरुद्ध गुन्हा दाखल..

नवरात्रीत मातृशक्तीस वाईट नजरेनी पाहणारा व्यापा-यास  जनतेनी चांगलाच प्रसाद दिल्याची चर्चा.

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

दि. 4 

तालुक्यातील सूनगाव  येथे गावातीलच

 28 वर्षीय विवाहित महिलेचा किराणा दुकानदाराने विजयभंग केल्याची घटना आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे याविषयी पीडित महिलेने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे 

या तक्रारीनुसार तिचे पती , 2 मुले तसेच सासु, सासरे यांच्यासह सुनगाव येथे राहते व आम्ही शेतमजुरी करुन  उदरनिर्वाह चालतो. गावातील दिलीप सुंदरलाल राठी यांचे किराणा दुकान असुन काही वस्तु लागल्यास ते नेहमी त्यांच्या दुकानात जात असतात.

दिनांक 04/10/2022 रोजी सकाळी 09/30 या दरम्यान त्या दिलीप राठी यांच्या किराणा दुकानात किराणासाठी गेले होते. तेव्हा दुकानदार  किराणा घेत असतांना त्या  ग्राहक महिले नी नारळ  मागीतले, त्यांनी छोटे नारळ दाखवल्यवर यापेक्षा मोठे आकाराचे नारळ दया असे म्हटले असता ,दुकानदार दिलीप राठी यांनी  “तु मला खुप आवडते. ,तु आत ये आणी तुला वाटेल ते नारळ घे “असे त्यांनी म्हटले त्यामुळे मला लज्जा उत्पन्न झाली म्हणुन मी त्याला म्हटले की,” माझे लग्र झालेले आहे तुम्हाला असे म्हणने शोभत नाही ” असे म्हणुन महिला तेथुन निघुन घरी गेली व झालेली  हकीगत तिच्या पतीस  सांगीतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरुद्ध 354अ दाखल केलेला असून पुढील तपास ठाणेदार सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कैलास चौधरी करीत आहे.

यापूर्वीही हा दुकानदार अशाच बरेच प्रकरणात प्रसाद खाऊन चुकला असल्याची चर्चा ही गावात दिवसभर सूरु होती.

Gajana
Leave A Reply

Your email address will not be published.