Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर ?

मुंबई – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाण्याची शक्यता आहे महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगाचा साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे महिला आणि बालकल्याण खाते हे काँग्रेस कडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते अशी शक्यता आहे आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर विद्या चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत .

रूपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण या दोघी महिलांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवत असतात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पद रूपाली चाकणकर यांच्याकडे आहे हे पद त्यांच्याकडे आल्यापासून अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची महिला आघाडी समर्थ करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दिल्या जाण्याच्या यादीमध्ये रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत सर्वात पुढे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.