Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

चिखली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने यांचा सत्कार

चिखली – अनुसूचित जाती जमाती समिती च्या दौऱ्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यात आलेले सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार श्री यशवंत तात्या माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिखली येथील कार्यालयाला भेट दिली असता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार माने यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.


अनुसूचित जाती जमाती च्या संदर्भात असलेल्या योजनांची त्यांनी सखोल माहिती दिली. शिवाय आमदार माने हे इंदापूर बाजार समितीचे उपसभापती असल्याने याठिकाणी उपस्थित चिखली कृऊबास चे उपसभापती राजीव जावळे, संचालक संजय गाडेकर, प्रशासक बाळासाहेब पवार यांच्या सोबत बाजार समितीच्या संदर्भात अभ्यासपूर्ण चर्चा केली. संघटना वाढीसाठी आवश्यक सुचनाही त्यांनी उपस्थितांना केल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष तथा उपसभापती कृऊबास चिखली राजीव जावळे , तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, शहराध्यक्ष रवि तोडकर, बाजार समिती प्रशासक बाळासाहेब पवार, ना. डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांचे जनसंपर्क अधिकारी संतोषराव लोखंडे, मालगनी सरपंच प्रकाश चिंचोले, बळीराम काळे, सुनिल सुरडकर, भाई प्रशांत डोंगरदिवे, उमेश राठोड आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.