Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोरोना अलर्ट प्राप्त 772 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 792 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 772 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 20 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपीड अँटीजेन चाचणीमधील 13  अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 482  तर रॅपिड टेस्टमधील 290 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 772 अहवाल निगेटीव्ह आहेत.

corona

                                                                                       पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे.राजा शहर : 6, दे. राजा तालुका : दगडवाडी 1, चिखली तालुका : केळवद 1, पेठ 1, चिंचखेड 1, कोलारा 1, बुलडाणा तालुका : अंबोडा 1, सिं. राजा तालुका : आंचली 1, लोणार तालुका : कोयाळी दहातोंडे 6, वाडी वाघोली 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 20 रूग्ण आढळले आहे.                                                                                   त्याचप्रमाणे आजपर्यंत 689428 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86696 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86696 आहे.  आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 689428 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87413 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86696 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 44 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.