Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्यात कोरोना अहवाल ५० च्या खाली ….

बुलडाणा दि.10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4020 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3978 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 42 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 20 व रॅपीड टेस्टमधील 22 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 826 तर रॅपिड टेस्टमधील 3152 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3978 अहवाल निगेटीव्ह आहेत.

covide 19

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :3, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, कोलवड 4,   मलकापूर शहर :1,  मोताळा तालुका : पुन्हई 3,   सिं. राजा तालुका : चिंचोली 2, दोंडगाव 1,   दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : कुंभारी 1, तुळजापूर 1, पांगरी 1, वाकड 1, किन्ही पवार 1,   खामगांव शहर : 2,     चिखली शहर : 2,  चिखली तालुका : कोलारा 1, काटोडा 1,  शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : मनसगाव 1,     संग्रामपूर शहर : 1, मेहकर तालुका : दे साकर्षा 1, गोमेधर 1, चिंचोली बोरी 1, दुधा 1, मोसंबेवाडी 2,  जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : सुनगाव 1,  नांदुरा तालुका : निमगांव 1, चांदुर बिस्वा 1, लोणार शहर : 1,  लोणार तालुका: परजिल्हा कारंजा ता. बाळापूर 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 42 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखली येथील 80 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 339 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 518383 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84719  कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  84719 आहे. 

  आज रोजी 1294 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 518383 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85825 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84719 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 466 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 640 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.