Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोरोना अलर्ट : जिल्यात आज एक मृत्यू ; तर 18 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि.21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1019 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1001 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपीड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 253 तर रॅपिड टेस्टमधील 748 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1001 अहवाल निगेटीव्ह आहेत.

COVIDE 19

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : दुर्गादैत्य 1, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : टेंभूर्णा 1, पिं. राजा 1, मेहकर तालुका : वरोडी 1, जळगांव जामोद तालुका : वडगांव गड 1, पळसखेड 1, धानोरा 1,  बुलडाणा शहर : 4, लोणार शहर : 1,  मलकापूर शहर : 1, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : जांभोरा 1, नांदुरा तालुका : दादगाव 1,  परजिल्हा रिसोड 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.  तसेच उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय बुलडाणा येथे पेनटाकळी ता. मेहकर येथील 90 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 549386 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85529 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85529 आहे.

  आज रोजी 1152 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 549386 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86293 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85529 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 110 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 654 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.