Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोना बॅकफूटवर; आजही नवीन पॉझीटीव्ह ‘शून्य’

बुलडाणा, : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल, मे महिन्यात फ्रंटफूटवर असणारा कोरोना विषाणू आता बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाने नविन रूग्ण आढळण्यापासून आजच्या स्वातंत्र्य दिनी खऱ्या अर्थाने ‘स्वातंत्र्य’ दिले आहे. आज 2469 तपासणी अहवालांमध्ये एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हावासियांना नवीन पॉझीटीव्ह रूग्णसंख्येच्या ‘शुन्या’ने सुखद धक्का दिला आहे.

     प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2469 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी संपूर्ण 2469 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 0 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 440 तर रॅपिड टेस्टमधील 2029 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2469 अहवाल निगेटीव्ह आहेत.

        तसेच आज एका रुग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 667508 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86641 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86641 आहे. 

  आज रोजी 1325 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 667508 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87354 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86641 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 41 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.