Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मळ्यातील बैल जोडी व ३ गाई चोरी १ लक्ष रुपायाचे नुकसान शेतकरी यांची पोलिसात तक्रार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल

COW

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात गोधन चोरणारी टोळी सक्रीय असुन तालुक्यात सोनाळा सगोडा लाडणापुर , यापुर्वी गोधन चोरी गेल्याच्या घटना घडल्या त्याचा अदयापही थांगपत्ता लागला नाही तालुक्यातील वरवट बकाल येथील कॉग्रेस सेवादलचे नेते श्याम डाबरे यांच्या वरवट ते पातुर्डा रसत्या वरिल मळयातील गोठ्यातुन गोधन चोरी करणाऱ्या टोळीने बैल जोडी व ३ जरशी गाई चोरी झाल्याची घटना दि ११ जुलै च्या मध्यरात्री घडली याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचा गोधन चोरी गेला अधिकृत तक्रारी पशुपालक शेतकऱ्यांनी केल्या मात्र पोलीसांकडून एकही गुन्ह्याचा तपासात पशुधन चोरी प्रकरणी चोरट्याला अटक झाली नाही तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकरी श्यामराव डामरे यांचे वरवट बकाल पातुर्डा रोडवर वरवट बकाल शिवारात मळा असुन सदर मळ्यातच गुरांसाठी गोठा बांधलेला आहे सदर गोठ्यात स्वता शेतकरी कुटुंबातील व्यक्ती रात्री झोपण्यासाठी असतो मात्र गेल्या दिर्घ काळा पासुन थांबलेला पाऊसाला दोन दिवसा पासुन सतत सुरु असल्याने गोठ्यात कोणी नसल्याची संधी साधुन दि ११ जुलैच्या मध्यरात्री पशुधन चोरी करणाऱ्या टोळीने चार चाकी वाहनात २ बैल ३ जरशी गाई त्यात (दुभती गाई ) ५ जनावरांची किंमत १ लक्ष रुपये गोठ्यातुन चोरुन नेल्याची लेखी तक्रार शेतकरी श्याम डामरे यांनी तामगाव पो स्टेला दिल्या वरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.