Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

गुन्ह्यातील ७ आरोपीस अटक करून ७ लाख६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रवींद्र सुरुशे मेहकर, – पोलीस स्टेशन सिताबर्डी , नागपुर येथे दाखल झालेल्या अपराध क्रमांक ३५२/२०२१ गुन्हायातील आरोपी हे गुन्हा करून नागपुर वरून औरंगाबाद करीता महाराष्ट्र ट्रव्हल्स क्रमांक MH ०३ CP १ ९ ०१ मध्ये दिनांक १३/०८/२०१२ रोजी दुपारी ०३/०० वाजता दरम्यान निघाले आहे .

अशी माहीती नागपुर पोलीसांकडुन पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया , अपर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांना मिळाली असता सपोनि युवराज रबडे , पोउपनि अशोक जायभाये , पोहेकॉ . मोहन जाधव , संजय पवार , श्रीराम निळे , नापोका , विजय बेंडवाल , ईश्वर सोनुने , गणेश लोढे , सुरेश मोरे , गजानन पांढरे व सरकारी वाहन चालक प्रविण साबळे यांनी खंडाळा बायपास , मेहकर रोडवर जावुन नाकाबंदी करून रात्री १२/०० वाजताचे सुमारास ट्रव्हल्स चेक केली

असता त्यात सात संशईत व्यक्ती मिळुन आल्या त्यानंतर त्यांना सिसिटीव्ही फुटेज वरून व त्याचे अंगातील कपडयावरून त्याची खात्री पटवुन त्यांना त्याचे नावगाव विचारले असता १ ) मुत्तुकुमार सुखनिगम वय ४१ वर्ष रा . गांधीनगर , राज्य – तामीळनाडु २ ) गुना थानिकाचलम वय २४ वर्ष रा.गांधीनगर , तामीळनाडु ३ ) व्यंकटेश सोरेन रविंद सोरेन वय ३२ वर्ष रा.पोगनुर जि.बिची , तामीळनाडु ४ ) थिलक कंथासामी वय ३५ वर्ष रा.गांधीनगर , तामीळनाडु ५ ) किती दुराई वय ४५ वर्ष रा.गांधीनगर , तामीळनाडु ६ ) भास्कर कथीरवेल शेरवई वय ५१ वर्ष रा . रामजीनगर तामीळनाडु ७ ) गोबीनाथ दुरईसामी वय ५२ वर्ष रा.गांधीनगर , तामीळनाडु असे सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता गुन्हयात चोरी गेलेले नगदी रोख पैकी ४,८८,००० / – ( चार लाख आठयाऐशी हजार ) रुपये हे जप्त करण्यात आले .

तसेच त्याचे कडे तीन लॉपटॉप व मोबाईल व इतर साहीत्य असे एकुन किंमती ७.६६,००० / – ( सात लाख सहासटट ) हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला . व पुढील तपासकामी त्यांना दिनांक १४ ऑगस्ट रोजी – गुन्हे शाखा नागपुर यांचे ताब्यात देण्यात आले .

Leave A Reply

Your email address will not be published.