Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य. डॉ.अक्षय गुठे यांचे कार्य ठरतायत तालुक़ा वासियाना साठी देवदुता सारखे

देऊळगांव राजा :-आजच्या आधुनिक युगात आणि धकाधकीच्या जिवनात माणुसकी उरली नाही अशी सर्वत्र बतावणी केली जाते पण कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात माणुसकीचे दर्शन घडविण्यासाठी अनेक हात समोर येत आहे.

Dr.Akshay Gutthe


अशीच माणुसकी जोपासणारे आणि तालुक्यातील आरोग्य विभागाला महत्वकांक्षी बळकटी देणारे व्यक्तीमत्व म्हणजे देऊळगांव राजा येथिल ग्रामीण रूग्णालयातील १०८ रूग्णवाहिकेच्या माध्यमातुन कार्यरत असणारे डॉ.अक्षय गुट्ठे आहेत.
सुरुवातीला कोरोना जेव्हा शहरात धडकला तेव्हा तालुक्यातील सर्व आरोग्य विभाग अलर्ट झाला तेव्हा शहरात अढळलेल्या पहिल्या संशयित रुग्णाला पुढील उपचारासाठी जिल्हास्तरावर म्हणजेच बुलडाण्याला दाखल करण्याची जबाबदारी डॉ.अक्षय गुट्ठे यांच्यावर देण्यात आली ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन विलगीकरण कक्षात दाखल केले.आपल्या शांत,मनमिळावु आणि अभ्यासपुर्ण स्वभावाचा अचुक वापर आणि परिपुर्ण नियोजन करीत रुग्णांवर ओढवलेल्या संकटाला माघारी पाठवण्याचा त्यांचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो.
या रूग्नवाहीकेने यात १ वर्षात जिल्ह्यामध्ये १२६७९ कोरोणा रूग्नांना सेवा दिली तश्याच प्रकारे देऊळगाव राजा विभागात १०८ मार्फत ९२ अपघात रूग्न,१६ जखमी रूग्न, ८८ विषबाधा
वर्षभरात कोरोणा काळातही सेवा दिली गेली आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन आणि सतर्कता यासंदर्भात ते नेहमीच नागरीकांना जनहितार्थ सुचना देत असतात.
त्याचबरोबर रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्याबरोबर अचुक सल्ला देण्याचे काम ते करीत असतांना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु डॉ.गुट्ठे देत असलेली रुग्णसेवा प्रामाणिक स्वरुपाची असल्याने त्यांची रूग्ण सेवा अडचणींचा कर्दणकाळ ठरत असल्याचे नागरीकांच्या नम्र भावनेतुन जाणवत आहे.
डॉ.गुट्ठे यांनी “रुग्ण सेवा हिच ईश्वर” सेवा हा स्वतःच्या मनाशी घट्ट केलेला मुळमंत्र आणि त्याला असलेली प्रामाणिकतेची जोड त्यांच्या सेवेचा आलेख उंचावत आहे कारण त्यांनी आतपर्यंत कोरोनाचे संक्रमण झालेले,अपघात झालेले अनेक गंभीर रूग्णांना प्रथोमउपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हास्तरावर १०८ रूग्णवाहिकेच्या माध्यमातुन पोहचवुन जिवनदान देण्याचे काम केले.
डॉ.अक्षय गुट्ठे हे २४ तास रूणांसाठी सेवा देत असुन त्यांच्या या सेवेमुळे आणि १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले डॉ.अक्षय गुठे,पायलट सुभाष कणखर आणि पायलट संदिप बुधवत यांचा समन्वय व समयसुचकता तालुक्यातील आरोग्य विभागाच्या प्रामाणिक कार्याची साक्ष देत आहे.
यामुळे स्थानिक नागरीक समाधान व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.