Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फतअन्न सुरक्षा सप्ताह राबवा – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

 

मुंबई,दि.१६ : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवून ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबविण्याचे विभागाने नियोजन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

dr rajendra shingne

         मंत्रालयातील दालनात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमांच्या जनजागृतीबाबतच्या नियोजनासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त परिमल सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) गणेश रामदासी यांसह वरिष्ठ अधिकारी या उपस्थित होते.

            अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, औषधे खरेदी करताना, हाताळताना व प्रत्यक्ष वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत सर्वसाधारण माहिती ग्राहकांना उपलब्ध झाली पाहिजे. सध्या सणांचा कालावधी आहे अशावेळी अन्न भेसळीच्या घटना घडू शकतात. अन्नभेसळ कशी ओळखावी याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या योजना यांची रेल्वे स्टेशन नजिकचा परिसर, खाऊ गल्ली, भाजीपाला व फळबाजार आदी विविध ठिकाणी जनजागृती होणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर भर देवून प्रचार व प्रसिध्दीचे उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया व सर्व माध्यमांव्दारे प्रसिध्दी करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केल्या.

            यावेळी अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा व मानके कायदा व विभागाची माहिती, उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

                                   

Leave A Reply

Your email address will not be published.