Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सुनगाव येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Gajanan sontakke

सुनगाव येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जळगांव दि 30:दिनांक २९/९/२०२२ रोजी सराई महादेव मंदिर सुनगांव तालुका जळगांव जामोद येथे आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व पिएमएफएमई अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली, सदरील कार्यक्रमाला श्री पराग गवई यांनी पिएमएफएमई या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ मार्गदर्शक श्री गाभणे सरांनी कपाशी सोयाबीन, तुर या पिकांचे किड व रोगाबाबत मार्गदर्शन केले व शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण केले.सोयाबीन मधील वेगळे गुणधर्म असलेली झाडे कशी ओळखावी व घरचे बियाणे कसे व्यवस्थीत राखुन ठेवावे या बद्दल सांगीतले.विषय विशेषज्ञ श्री जानोतकर सर यांनी लम्पी या आजारावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तालुका कृषी अधिकारी श्री धिरज वाकोडे साहेब यांनी रब्बी हंगामात घेण्यात येणा-या जवस मोहरी ज्वारी व करडई या पिकाबाबात व मार्गदर्शन केले व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर राऊत यांनी केले असुन फवारणी करतांना घ्यावयाची काळजी व रब्बी पिकांचे बिजप्रकीया बाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मोहनसिंह राजपुत यांनी सहकार्य केले कार्यक्रमाला गावाचे सरपंच श्री रामेश्वर अंबडकार,श्री अशोक काळपांडे , महीला गट, शेतकरी गट व शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.