Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली खुरमपुर येथे सांत्वनपर भेट

KHURAMPUR

लोणार,विष्णु आखरे पाटील – लोणार तालुक्यातील खुरमपुर येथील डिंगाबर अण्णा डोंगरे यांचे काही दिवसांपासून पुणे येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले होते. डिंगाबर अण्णा डोंगरे एक शिवसैनिक होते त्याचबरोबर अत्यंत मनमिळावू ,सर्वांना सोबत घेऊन काम करणारे व खासदार प्रतापराव जाधव यांचे जिवलग मित्र होती पुणे येथे उपचार घेत असताना डिंगाबर अण्णा डोंगरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर आज 19 जून रोजी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या कुटूंबियाची मुळ गावी खुरमपुर येथे भेट घेवून शोक संवेदना व्यक्त करून सांत्वन केले व धीर दिला. या दुःखद प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत अशा भावना खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले यावेळी प्रकाशराव मापारी, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष मापारी,भास्करराव घोडे, डॉक्टर दयानंद ओव्हर, सरपंच समाधान राठोड उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.