Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सुशिक्षीत बांधकाम पर्यवेक्षक फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश मंत्री टोपे यांच्यामुळे शक्य झाले – मगरे

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्यमंत्री अजित पवार यांनी तीन लाखांपर्यंतची मर्यादा वाढवून 10 लाखांचा शासन निर्णय दिनांक 20/05/2021 यारोजी काढला असून बांधकाम पर्यवेक्षक यांना न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया सुशिक्षीत बेरोजगार बांधकाम पर्यवेक्षक फेडरेशनचे अध्यक्ष कैलास मगरे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यामुळेच हे शक्य झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

RAJESH TOPE


नूकत्याच झालेल्या राज्य अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील बांधकाम पर्यवेक्षकांना न्याय देत तीन लाखांपर्यंतची मर्यादा ही दहा लाखांपर्यंत वाढविली आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन फेडरेशनच्यावतीने करण्यात आले. सुशिक्षीत बेरोजगार बांधकाम पर्यवेक्षक फेडरेशनच्यावतीने तीन लाखांची मर्यादा ही वाढवून पंधरा लाखांपर्यत करण्याची मागणी करण्यात आली होती. जालना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत या बाबत पाठपुरावा करण्यात येत होता. फेडरेशनचे अध्यक्ष कैलास मगरे तथा पदाधिकारी यांनी या संदर्भात आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली होती. यावर श्री टोपे यांनी याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून न्याय देण्याबाबत आश्‍वासित केले होते. अर्थमंत्री श्री पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे फेडरेशनच्यावतीने स्वागत करण्यात येत असल्याचेही श्री मगरे म्हणाले.
बांधकाम पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम मागील सरकारने सुरु केला होता. त्यामाध्यमातून हजारांवर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत अभ्यासक्रम पुर्ण केला होता. मात्र, शासनाने तीन लाखांपर्यंतचीच मर्यादा ठरवून दिली. व त्यावरील सर्व टेंडर ऑनलाईन केले. मोठ्या टेंडरवाले सर्व छोटे टेंडर क्लब करून घेत. परिणामी बांधकाम पर्यवेक्षकांना काम मिळायचे नाही त्यामुळे ही मर्यादा वाढवून 15 लाख करण्यासंदर्भात फेडरेशच्यावतीने मागणी करण्यात आली होती. आता महाविकास आघाडी सरकारने मर्यादा वाढविल्याने बांधकाम पर्यवेक्षकांना काम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे तसेच अर्थमंंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेही फेडरेशनच्यावतीने अध्यक्ष कैलास मगरे,यांनी आभार मानले, सचिव अरविंद देशमुख, उपाध्यक्ष मनोज झिने, कोषाध्यक्ष विराज कांबळे, सदस्य गणेश माधोवाले, सदानंद खंदारे, विजय राठोड, सि.के.डोईफोडे, शिवराज जाधव, अनिल वाघमारे, भगवान नाईकनवरे आदींनी विशेष आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.