Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मका खरेदी पुन्हा सुरू ; 30 जुनपर्यंत मुदत 14 खरेदी केंद्रांना मान्यता

बुलडाणा दि.15 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दराने मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. येत्या 30 जून पर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. तसेच मका खरेदीसाठी शासनाने 60 हजार क्विंटलटचे उदिष्ट दिलेले आहे.

   तसेच जिल्ह्यामध्ये मका खरेदीसाठी 8924 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.  जिल्ह्यामध्ये पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा संपन्न झाली.   त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मका खरेदीसाठी 14 खरेदी केंद्रांना तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपूर, शेगांव , मलकापूर, जळगाव जामोद व खानगाव, तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल अॅग्रो प्रोड्युसर कंपनी  सुलतानपुर केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी  देऊळगाव राजा केंद्र – सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा केंद्र- वाडी या केंद्रांना मान्यता दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी, बुलडाणा यांनी जिल्ह्यामध्ये उपरोक्त ठीकाणी मका खरेदी सुरु करण्याचे आदेश दिलेले आहे.

MAKA

   त्यानुसार ज्या शेतकन्यांना खरेदीसाठी एस एम एस येतील.  त्यांनी वरील संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे  यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.