Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा च्या वतीने बिजोत्पादन मार्गदर्शन शिबिर

सिंदखेड राजा – माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह च्या अंतर्गत पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेबांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा सिंदखेड राजा तालुका जिल्हा बुलडाणा च्या वतीने आज दिनांक ,१० डिसेंबर रोजी जांभोरा येथे श्री नामदेवराव खरात यांच्या शेतावर शेतकरी मेळावा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ncp


राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस किसानसभेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत,खरेदी विक्रीचे मुख्य प्रशासक खरात साहेब, किसानसभा जिल्हा उपाध्यक्ष भारतभाऊ भोसले, शिवानंद शिंदे सोशल मीडिया संयोजक अमोल भट यांच्या उपस्थितीत हे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सुरवातीस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .याप्रसंगी किसान सभा सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष गजानन गाजे यांनी प्रास्ताविक केले, सोशल मीडिया संयोजक अमोल भट यांनी पवार साहेब हे एक विचार आहेत आणि हा विचार ज्याने अमलात आणला त्याच्या जीवाचे सोनं होते असं सांगत पवार साहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला. किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद शिंदे यांनी किसान सभेच्या कार्याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तर खरेदी विक्रीचे मुख्य प्रशासक खरात साहेबांनी पोकरा योजनेची माहिती दिली.


किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांनी बिजोत्पादन आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करण्याच्या पद्धती आणि फायदे याविषयी बोलतांना शरदचंद्र पवार साहेबांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीचे प्रयोग करून पश्चिम महाराष्ट्रातील शेती विकसित करून शेतकरी अर्थ समृद्ध केले तेच विचार आपण आचरणात आणून आपली ही आर्थिक उन्नती साधली पाहिजेत असा विचार व्यक्त केला.


अध्यक्षीय भाषणात शिवाजी राजे जाधव यांनी पवार साहेबांच्या दुरदृष्टी, आजवर घेतलेले विधायक निर्णय, ध्येय धोरणांवर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष गजानन गाजे व नामदेवराव खरात यांनी केले होते. परिसरातील अनेक शेतकरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
या शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे सुत्रसंचलन खरात सर यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.