Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेगाव जुगारअड्ड्यावरील छाप्यात 4 लाखांचा मुद्देमाल जप्त १० आरोपी अडकले .

शेगाव – शेगाव येथील बाळापूर रोडवरील वनविहार ढाब्याच्या मागील जंगलात गोपनीय माहितीवरू जुगाराच्या अड्ड्यावर शेगाव शहर पोलिसांनी छापा मारून बडे मासे गळाला लावले .यातील अनेक आरोपी प्लॉटिंग व्यवसायाशी संबंधित आहेत आरोपींकडून 4 लाख 14 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .गोपनीय माहितीवरून शेगाव शहर पोलिसांनी छापा मारून 10 धन दांडगे मासे आरोपी पकडले . शेगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे व सहायक फौजदार लक्ष्मण मिरगे , पो.ना. गणेश वाकेकर , पो.ना. उमेश बोरसे , पो.काँ . विजय साळवे , पो.काँ . प्रकाश गव्हांदे , पो.काँ . हरिचंद्र बारवाल यांच्या पथकाने ठाणेदार श्री . टाले यांच्या नेतृत्त्वात हा छापा मारण्यात आला .

JUGAR ADDA


छापा मारून पकडण्यात आलेले आरोपी – समीर जगन्नाथ मोरे ( 44 , रा . साईनगर , शेगाव ) , अनंता प्रल्हाद चव्हाण ( 45 , रा . रोकडियानगर , शेगाव ) , विष्णू समाधान निळे ( 37 , रा . सिरजगाव निळे , ता . शेगाव ) , श्रीकृष्ण महादेव चारोळे ( 43 , रा . ताडी , शेगाव ) , श्याम तुळशीराम नेमाडे ( 45 , रा . डोंगरगाव , ता . बाळापूर , जि . अकोला ) , शिवशंकर शेषराव शेजोळे ( 45 , रा . येऊलखेड , ता . शेगाव ) , महेंद्र वासुदेव अग्रवाल ( 35 , रा . एसबीआय कॉलनी , शेगाव ) , अनिल साहेबराव वक्ते ( 36 , रा . रोकडियानगर , शेगाव ) यांना अटक करण्यात आली आरोपींकडून 6 मोबाइल , 7 मोटारसायकली , जुगार साहित्य असा एकूण 4 लाख 14 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.