Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

स्वाभिमानीने कृषी कार्यालयात सोडले वानी किडे.वाणीचा प्रादुर्भावमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई द्या!प्रशांत डिक्कर.

संग्रामपुर : कापुस, सोयाबीन असलेल्या मुख्य पिकावर वाणी किडीचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्याने वाणी किडीने शेतातिल पिके फस्त केल्याने त्या शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सुस्त असलेल्या कृषी विभागाला जागे करण्यासाठी चक्क कृषी कार्यालयात किडे सोडल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे.

SWABHIMANI

तालुक्यातील बहुतांश भागात १५ दिवसांपूर्वी पेरणी आटोपली असुन काही प्रमाणात पिकाची उगवण सुध्दा झाली आहे. पंरतु शेतात उगवलेल्या सोयाबीन, कापूस सारखे मुख्य पिकावर किडीचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्याने सर्व पिके पुर्णपणे फस्त होत आहेत. हवामान खात्याने वर्तविल्या अंदाजा नुसार शेताकऱ्यांनी पेरणी केली.पंरतु हवामान खात्याचे पुर्ण अंदाज फोल ठरल्याने कमी स्वरुपात पाऊस व पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे अती उष्णतामान कारणांमुळे पेरलेले बियाणे जमीनीत कुजले व उगवण झालेल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले पिके वाणी किडीने पुर्णपणे फस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. प्रशासनाने पेरणी केलेल्या शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी करत स्वाभिमानी चे प्रशांत डिक्कर यांनी पिकावरील किडे कृषी कार्यालयात सोडल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या वेळी नयन इंगळे, विशाल सावंत,अनुप देशमुख, विलास बोडखे, गोकुळ गावंडे, मंगेश भटकर,अरुण देऊळकाळ,सह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.