Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

दगावलेल्या बकरीसह स्वाभिमानी चे पशुसंवर्धन विभागात ठिय्या…

दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई द्या;दोषीवर कारवाईची मागणी

चिखली– पशुवैद्यकांनी पुकारलेल्या संपाची झळ बळीराजाला बसु लागली आहे.वारंवार माहिती देवुनही मुरादपुर येथील शेतकर्याची बकरीवर इलाज झाले नसल्याने दगावल्याची घटना दि०४आॅगस्ट रोजी घडल्याने तिच बकरी घेवुन स्वाभिमानी चे नितिन राजपुत, विनायक सरनाईक यांनी आक्रमक पावित्रा घेत चिखली पशुसंवर्धन कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे.व दोषींवर कारवाई करुण शेतकर्याना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.


सद्या पावसाळी हंगाम सुरु आहे.शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे.पशुधनावर अनेक शेतकर्याचा उदरनिर्वाह चालत असतो पावसाळ्यामधे जनावरे बिमार पडण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असते आणि हिच संधी शोधुन पशुवैद्यकीय अधिकार्यामध्ये पदविका विरुद्ध पदवीधर यांचा वाद पेटला असल्याने याची झळ शेतकर्याना बसली आहे.मोठे आर्थिक नुकसान शेतकर्याचे झाले आहे.असे असतांना संप मिटला तरीसुद्धा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दवाखाण्यात उपस्थीत नसल्याने मुरादपुर येथील शेतकरी सिद्धेश्वर गाडेकर यांची बकरी पशु संवर्धन विभागाच्या हलगर्जी पणामुळे दगावली असल्याची घटना घडली आहे.

SWABHIMANI

याबाबत सविस्तर असे की,गाडेकर यांच्याकडे १२बकर्या आहेत.त्यांनी रोख १५हजार देवुन बाजारामधुन तिन पिलं देणारी गामण बकरी खरेदी केली होती.ति बिमार पडल्यामुळे इलाजासाठी वारंवार पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांना वारंवार संपर्क केला परंतु कुणीच न आल्याने बकरीला कोलारा येथील पशुसंवर्धन कार्यालयात इलाजास्तव आनले परंतु त्या ठिकाणी कुणीही जबाबदार अधिकारी व मॅडम नसल्याने त्यांना संपर्क साधला तेव्हा डॉक्टर ला पाठवते म्हणुन सांगीतले गेले परंतु दोन तास उलटुन सुद्धा कुणी आले नसल्याने बकरीचा इलाज करणे आवशक असल्याने तिला अॅपेव्दारे चिखलीला आनले परंतु वेळीत उपचार झाला नसल्याने बकरी दगावल्याची माहिती शेतकर्याने स्वाभिमानी च्या पदाधिकारी यांना दिल्याने स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक,अनिल वाकोडे यांनी चिखली पशुसंवर्धन कार्यालय गाठले

परंतु तिथे सुद्धा कुणीच अधिकारी उपस्थीत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत दगावलेली बकरीच थेट पशुसंवर्धन कार्यालयात ठेवुन ठिय्या आंदोलन सुरु केले दरम्याण तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी,पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जी करणार्या अधिकारी व संबंधीत दोषींवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी शेतकर्याने लेखी पत्राव्दारे केली आहे.तर संपाच्या काळात तालुक्यात एकुण किती जनावरे दगावली याची चौकशी करुण त्या शेतकर्याना सुद्धा पशुसंवर्धन विभागाणे मदत द्यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन करण्यात आली आहे.यावेळी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,अनिल वाकोडे,मुरादपुर सरपंच अनंथा गाडेकर,शुभम पाटिल,राधाकिसन भुतेकर,सिद्धेश्वर गाडेकर,यांच्यासह आदि उपस्थित होते

पशुसंवर्धन विभागास आली जाग..

शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला आहे.परंतु कार्यालयाची वेळ वाढवुन दिले आहे.असे असतांना सुद्धा या वेळेत पशुसंवर्धन विभागात जबाबदार अधिकारी नसल्याने स्वाभिमानी ने अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांची चांगलीच तारंबळ उडाल्याचे दिसुन आले.

Leave A Reply

Your email address will not be published.