Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्व नोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील बिगर जीवनावश्यक सेवांची दुकाने शनिवार व रविवारी बंद असतील .

                

बुलडाणा, दि. २६ : राज्य शासनाने कोविड 19 च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंट चा धोका वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहे.  त्यानुसार  जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध  सोमवार, 28 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजे पासून पुढील आदेशापर्यांत लागू करण्यात आले आहे.  असे  प्रतिबंधात्मक आदेश आज  जिल्हा दंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी  पारित केले आहे.

UNLOCK

     या आदेशानुसार सर्व किराणा दुकानेस्वस्त धान्य दुकानेभाजीपाला दुकानेफळ विक्रेतेमिठाई दुकानेखाद्य पेय विक्री दुकानेपिठाची गिरणीतसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकनमटनपॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने)पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकानेतसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने५० टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) दुकानेदुध  संकलन  केंद्रे दूध वितरण  सायंकाळी  ६ ते  रात्री  ८ वाजेपर्यंत  सुरु राहतील.    सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकानेप्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्सचित्रपटगृहेनाट्यगृहे  पूर्णतः बंद राहतील.

    हॉटेल्सरेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार  तसेच अन्य दिवशी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणे,  खुले मैदानफिरणे व सायकलिंग साठी सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कार्यालये,  सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालये नियमितपणे  सुरू राहतील. दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत खेळांना परवानगी असेल. सामाजिकसांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने व ५० टक्के आसन

क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल. असे कार्यक्रम शनिवार व रविवार बंद असतील.

    सर्व केशकर्तनालयेसलुन,स्पा,ब्युटी पार्लर एकूण क्षमतेच्या ५० टक्के पूर्व नोंदणीसह दुपारी ४ वाजेपर्यंत  सुरू राहतील. वातानुकूलित सेवेस परवानगी नाही. लग्न समारंभ बँड पथककॅटरिंग आदींसह पूर्व परवानगीने कोविड  नियमांचे पालन करून  ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यसंस्काराला २० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल.सभाबैठका आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील.बांधकामावर जर बाहेरून मजूर असतील तर दुपारी ४ वाजेपर्यंत करता येतील. ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमितपणे सुरू राहतील. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहीलमात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू राहील. मात्र स्तर ५ मधील जिल्ह्यात जाणे येणे होत असल्यास ई पास आवश्यक राहील.

  सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवापशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु राहतील. सर्व प्रकारचे सहकारी संस्थाखाजगी व शासकीय बँकाविमा व वैद्यकीय सेवा कंपन्यानॉन बँकिंग वित्तीय संस्था सुरू राहतील. वीज  व  गॅस पुरवठा  सेवा एटीएम  आणि  डाक  सेवाकोल्ड  स्टोरेज  आणि वखार  सेवा आदी  नियमित  सुरु  राहतील.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच  सायंकाळी ५ नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सदर कालावधीत नागरिकांना मुक्त संचार करण्यास मनाई राहील. सर्व नागरिकआस्थापनादुकाने यांनी मास्क असणेहात सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतर राखणे या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. 

 सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदाभारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही  आदेशात  नमूद  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.