Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यामध्ये आजपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरु

बुलडाणा दि.22 : जिल्ह्यामध्ये आज 22 जून 2021 पासून कोविड ची  18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर लसीकरण मोहीमेस आज 5 आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे.

COVIDE VACCINE

  यामध्ये जिल्हा रुग्णालय बुलडाणा,  ग्रामीण रुग्णालय जळगांव जामोद, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी ता. मोताळा,  प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड ता. नांदुरा, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा ता. दे.राजा आदींचा समावेश आहे.  जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच सदर लसीकरण मोहीम कार्यान्वित होईल, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ गोफणे यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.