Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

विवेकानंद स्मारक व हरिहरतीर्थक्षेत्रावर वृक्षारोपण…पर्यावरण दिनाचे औचित्य

HARIHAR TIRTH

मेहकर प्रतिनिधी – 5 जून हा पर्यावरण दिन आहे. सर्वसामान्यांच्या मनात रक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, पर्यावरणाचा समतोल वाढते शहरीकरण, औघोगीकरण, विस्तारवादाचा दुराग्रह, युध्दे यामुळे ही सुंदर वसुंधरा व तीने धारण केलेले जैविक, अजैविक, घटकांचा नाश होत आहे. या सर्वात महत्वाचे म्हणजे वृक्षतोड व त्यामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम अत्यंत घातक आहेत. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विवेकानंद आश्रमाच्या विवेकानंद स्मारकाच्या नयनरम्य परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

चहूबाजूंनी पाणी, सहा एकराचे विस्तीर्ण बेट, 20 फुट भगवेवस्त्रधारण केलेली स्वामीजींची भव्य प्रतिमा व उंच नारळाची व बॉटलपामची झाडे. यावेळी या परिसरात पुन्हा झाडे लावण्यात आली. पर्यटक व भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले विवेकानंद स्मारक अतिशय सुंदर व आकर्षक बनत आहे. निसर्गाचे सानिध्य व पर्यावरणीय मोहकता मनाला प्रसन्न करणारी आहे. विवेकानंद स्मारकावर पोहचण्यासाठी बोटीची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थक्षेत्रावर सुध्दा पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.देवानंद पवार, श्री. लक्ष्मणराव घुमरे साहेब, मेहकर नगराध्यक्ष कासम गवळी, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, सचिव संतोष गोरे, श्री. दिगंबर मवाळ, श्री. नितीन इंगळे व सर्व पदाधिकारी तथा आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.