Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने वर्ग खोलीतच केली गळफास घेऊन आत्महत्या.. आत्महत्येने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने वर्ग खोलीतच केली गळफास घेऊन आत्महत्या.. आत्महत्येने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा…

जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथील स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील बीकॉम फर्स्ट इयरला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने क्लासरूम बंद असताना खिडकी मधून आत प्रवेश करून रुमालाच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान उघडकीस आल्याने संपूर्ण महाविद्यालयाच्या परिसरात शहरातील नागरिकांनी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सदर मृतक युवक जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव येथील असल्याचे समजले. सदर मृतक युवकाचे नाव सुरज गावंडे वय २० वर्षे असून तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्येच शिक्षण घेत होता तो सध्या बीकॉमच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता.. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्यामुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी २ ला असल्यामुळे महाविद्यालयाचे शिपाई हे बेंचवर परीक्षेचे नंबर टाकण्याकरिता गेले असता खिडकीमधून त्यांचे लक्ष गळफास घेऊन लटकत असलेल्या विद्यार्थ्यांवर गेली असता सदर घटना उघडकीस आली. त्याला खाली घेऊन ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर विद्यार्थी हा स्मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाचा होता. कॉलेजमध्येही त्याचे सर्वांसोबत चांगले संबंध होते. सदर मृतक सुरज गावंडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप करू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज खुंटे पोलीस कॉन्स्टेबल सुरज गवई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन तेथील परिस्थिती हाताळून नागरिकांची गर्दी कमी केली.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळे परीक्षेच्या ताण आहे की आणखी काही अशी कुजबुज नागरिक करीत होते.. मृतक सुरज याचे शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज खुंटे करीत आहे..

Gajnana
Gajnana
Leave A Reply

Your email address will not be published.