सुनगाव येथील विद्यार्थीनि अकोल्या जिल्ह्यातून दुसरी व अमरावती विभागातून चौथी मेरीट
गजानन सोनटक्के जळगाव जा
एल आर टी वाणिज्य महाविद्यालय अकोला येथे शिकत असलेली विद्यार्थिनी व जळगाव जामोद येथील सुनगाव येथील रहिवासी वृषाली मधुकर वंडाळे अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी 2022 कर निर्धारण पदविका परीक्षेत अकोला जिल्ह्यातून दुसरी व अमरावती विद्यापीठातून चौथी मिरीट आली आहे वृषाली हिचे प्राथमिक शिक्षण सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे झाले असून त्यानंतर तिने बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून बीकॉम पदवी एल आर टी कॉलेज येथे वाणिज्य महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली तसेच वृषाली कर निर्धारण पदविका परीक्षेत कष्ट चिकाटी करून अभ्यासाच्या जोरावर विद्यापीठातून चौथी मेरीट आली आहे तिच्या या यशाचे श्रेय ती आई वडील व शिक्षकांना देत असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे

