Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेतकऱ्याने उपटले कपाशीचे पीक

गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शिवारातीलअमोल बबन कापरे या शेतकऱ्याने आपल्या गट नंबर 160 या शेतात कपाशीची लागवड आठ जून रोजी केली होती व कपाशीला दोन फवारणी व दोन खते होऊन कापसाची मशागत चांगल्या प्रकारे केली आहे कपाशी आज रोजी अडीच ते तीन फूट उंच बहरलेली असताना अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतातील एक एकर कपाशी शेतकऱ्याने चक्क उपटवून टाकली आहे या कपाशीच्या मुळा लगत जमिनीत मोठ्या प्रकारचे किडे दिसून येत आहे तरी ही कपाशी बहरलेली असताना शेतकऱ्यावर पिक उपटून टाकण्याची वेळ आली आहे तरी संबंधित कृषी विभागाने याचा पंचानामा करून शेतकऱ्याला मदत मिळावी असे मागणी मातृतीर्थ लाईव्ह च्या माध्यमातून शेतकऱ्याने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.