Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सावधान काल निरंक तालुके आज पॉसिटीव्ह , तर 53 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि.17– : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3100 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3047 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपीड टेस्टमधील 21 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 609 तर रॅपिड टेस्टमधील 2438 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3047 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :3, बुलडाणा तालुका :कोलवड 1, येळगांव 2,  संग्रामपूर तालुका :  शेगांव तालुका : मनसगांव 2, वरूड 1, पहुर पुर्णा 1,  मोताळा तालुका : तालखेड 2, कोथळी 1,  सावरगांव 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : तांदुळवाडी 1, उमाळी 1,  उमरखेड 2,    चिखली शहर : 4, चिखली तालुका : उंद्री 1, मलगी 1, पेनसावंगी 2, कव्हाळा 1,      सिं .राजा तालुका : रताळी 2, वर्दडी 1, किनगांव राजा 1, वडाळी 1,    दे. राजा तालुका : जांभोरा 1,उंबरखेड 1,   मेहकर शहर : 2, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : कवडगांव 1, कुंबेफळ 1, किन्ही महादेव 1, जनुना 1, दिवठाणा 3, बोरी अडगांव 1,    जळगांव जामोद शहर :5, जळगांव जामोद तालुका :  आसलगांव 1, लोणार तालुका : पिंप्री खंडारे 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान काँग्रेस नगर, बुलडाणा येथील 56 वर्षीय महिला व गांगलगांव ता. चिखली येथील 60 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

covide 19

      तसेच आज 61 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 540332 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85371 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85371 आहे.

  आज रोजी 1421 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 540332 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86133 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85371 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 109 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 653 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.