सुनगाव येथे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
गजानन सोनटक्के
जळगाव जा
सुनगाव येथे 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे दिनांक 12 मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली सुनगाव येथील 32 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी भरत आत्माराम काळपांडे या शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने स्लॅप ला गळफास घेऊन आत्महत्या केली सदर शेतकऱ्याने आत्महत्या केली तेव्हा त्याचे नातेवाईक लग्न कार्यासाठी बाहेर गावी गेले होते सदर शेतकऱ्यावर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईकाने सांगितले सतत होणारी नापीकी व कर्जबाजारीपणा याला कंटाळून शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली सदर मृतक शेतकऱ्याला पत्नी वृद्ध आई-वडील एक लहान मुलगा असा आप्तपरिवार आहे या घटनेमुळे सून गावात शोककळा पसरली आहे