Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जळगांव जामोद तालुक्यात अतिवृष्टी व वादळी वारामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेताची महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर यांनी केली पाहणी

गजानन सोनटक्के

जळगांव जा तालुक्यातील कुरणगाड,तरोडा,गाडेगांव, सुकळी परिसरात तील गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असल्याने शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने सदर शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तात्काळ देण्याचा साठी पाठवपुराव करणार असल्याचे आश्वासन डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी कुरणगाड महसुल मंडळाच्या कार्यक्षेत्रात कुरणगाड, तरोडा, सुकळी,गाडेगांव,सह तालुक्यातील आदी गावातील क्षेत्रात अचानक अतिवृष्टी पावसामुळे सदर शेत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी येणारा पीक हे या वादळी वारा व अतिवृष्टीमुळे हिरावून गेले असल्याने या वादळी वारा अतिवृष्टीमुळे शेत क्षेत्रातील सोयाबीन,मका,कापूस,उडीद, ज्वारी, या सह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

GAJANAN

तसेच शेतातील जवळपास च्या नदी नाल्याना आलेल्या पाण्याच्या पुरा मुळे शेतात पाणी शिरल्याने शेत जमीन खरडून गेली असल्याने लागवडीसाठी असलेले शेताचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शेतात पाणी साचले असून उभे पीकांची नासाळी झाली आहे या परिसरातील नुकसान ग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करण्यासर्भात राज्य शासन दरबारी पाठवपुराव करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळुन देण्यासाठी कॉग्रेस पक्ष प्रयत्न करणार असून सदैव शेतकऱ्याच्या पाठिंसी खंबीर पणे उभे राहणार असल्याचे यावेळी शेत शिवारातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला.
यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर,संरपच राजुभाऊ सित्रे,माजी पं.स.सदस्य गजानन बोदळे,युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील,विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद सपकाळ,रामभाऊ जाणे,युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवदास जाने अविनाश आटोळे,अशोक गिरी,दादाराव आटोळे,सलीम शहा,हकीम भाई,वैभव गवई,ज्ञानेश्वर पांडुरंग जाणे,गणेश जाणे,अरुण जाणे,शिवा जाणे,अजय जाणे,वैभव जाणे,समाधान जाणे,लक्ष्मण जाणे,नकुल जाणे,कुरणगाड सरपंच पती संदेश आठवले,विठ्ठल आटोळे, मोहन आटोळे, राजेश आठवले,संदिप मोरखडे,अर्जुन अवकाळे,तेजराव कोठे,सुरेश आटोळे,अशोक जळमकार आदींचा उपस्थित होती….
यावेळी जळगांव जामोदच्या तहसीलदार मँडम,कुरणगाड चे ग्रामसेवक पवार साहेब,कृषी सहाय्यक भगत साहेब, तलाठी सराफ साहेब ,ग्रामसेवक समाधान जाणे,उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.