सुनगाव ग्रामपंचायत ला लागले ग्रामसेवक बदलीचे ग्रहण
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत सूनगाव ग्रामपंचायतीला सध्या ग्रामसेवक बदलीचे ग्रहण लागलेले आहे 2015 ते 2021 या कार्यकाळात श्री टी जी चौधरी यांनी पाच ते सहा वर्षाचा कार्यकाळ सुनगाव ग्रामपंचायतला सेवा दिली परंतु त्यानंतर श्री ग्रामसेवक देवरे हे 2021 ला रुजू झाले त्यांच्याकडे सावरगाव ग्रामपंचायत असल्यामुळे सुनगाव येथे ते प्रभारी ग्रामसेवक म्हणून रुजू झाले त्यांनी चार ते पाच महिने प्रभारी पद सुनगाव ग्रामसेवक हे सांभाळले व त्यानंतर दोन फेब्रुवारी येथे श्री धोटे ग्रामसेवक रुजू झाले परंतु पंधरा दिवसातच खातेबदल व गाव समजण्यातच त्यांची बदली झाली त्यानंतर मार्च महिन्यात श्री खोद्रे ग्रामसेवक हे रुजू झाले आहेत तरीत्यांचेकडे सुद्धा धानोरा ग्रामपंचायत असल्यामुळे सुनगाव हा ग्रामपंचायतीचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे सुनगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून या ग्राम विकास अधिकारी पद हे व्हिडीओ दर्जाचे नियुक्त असून त्या दर्जाचा ग्रामसेवक पंचायत समिती गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडून सुनगावला द्यावा
ग्रहणामुळे सुनगाव येथील विकास खुंटलेला आहे दर पंधरा दिवसात होनाऱ्या बदलीमुळे गाव समजण्याच्या आतच व खातेबदल होतेच तो या वेळातच ग्रामसेवकांची बदली होत आहे तरी पंचायत समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन सुनगाव गावाच्या विकासासाठी सुनगाव येथे कायमस्वरूपी व्हिडिओ दर्जाचा ग्रामसेवक हा सुनगाव ग्रामपंचायत येथे सेवेसाठी कायमस्वरूपी नियुक्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे