Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

बुलडाणा दि. २२: त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद सर्व राज्यामध्ये उमटत आहेत. त्याच प्रमाणे अमरावती, यवतमाळ व नांदेड जिल्हयामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये या करीता जिल्हयातील तालूका ठिकाण व नगर परिषद हददी मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी लागू केले आहे.   सदर जमाव बंदीचे आदेश रविवार दिनांक २१ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासुन मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर चे रात्री ११ वाजेपर्यंत जिल्हयातील तालुका ठिकाण व नगर परिषद क्षेत्रात लागु करण्यात येत आहे. जमावबंदीच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतिबंध राहणार आहे. या दरम्यान कोविड लसीकरणाचे काम नियमितपणे सुरु राहील.  कोणत्याही प्रकारच्या रॅली,धरणे, आंदोलने, मोर्चे इत्यादींचे आयोजन करता येणार नाही. सदर आदेशाची प्रभावीपणे अंमलबाजवणी होण्याचे दृष्टीने पोलीस अधिक्षक बुलडाणा यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी/कर्मचारी व संबधीत विभाग यांना त्यांचे स्तरावरुन अवगत करावयाचे आहे.  तसेच जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.    त्याचप्रमाणे या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या निर्बंधाची किंवा निर्गमित केलेल्या आदेशाच्या अवज्ञा करणा-या व्यक्ती किंवा संस्था यांनी भा.दं.वि, 1860 (45) चे कलम 188 अन्वये शिक्षापात्र अपराध केला आहे असे मानण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे. 

jamavbandi

Leave A Reply

Your email address will not be published.