Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पाणावलेल्या डोळ्यांनी गावच्या सूपुत्रास निरोप

प्रतिनिधी सचिन मांटे – लोणार तालुक्यातील बीबी येथील जवान किशोर काळुसे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दिनांक.४ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. मूळचे देऊळगाव कोळ येथील रहिवाशी असलेले काळूसे वयाच्या १९ वर्षी २००९ साली सैन्यात भरती झाले.

JAWAN

सैन्यात असतांना त्यांनी सीलगुडी व पंजाब येथे सेवा दिली.वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांची २०१९ साली बदली अहमदनगर येथे झाली होती ते नायब सुभेदार या पदावर रुजू होत. ४ ऑगस्ट रोजी त्यांना ह्रदयविकारचा तीव्र झटका आला व उपचार दरम्यान त्यांना मरण आले.त्यांच्या गेल्याने संपूर्ण बीबी गावात व आसपासच्या खेड्यात शोकाचे वातावरण निर्माण झाले.त्यांच्या वर्गमित्र यांनी त्यांच्या आठवनीला उजाळा दिला.आई ने आपला मुलगा,भावाने व बहिनिने आपला भाऊ,बायकोने आपला पती आणि अगदी ३ वर्षाची आपली मुलगी हिने आज आपले वडील गमावले पाणवलेल्या डोळयांनी समस्त कुंटुब व गावकरी यांनी “अमर रहे,अमर रहे, किशोर काळूसे अमर रहे” “भारत माता कि जय”, अश्या घोषणा देऊन आपल्या सुपुत्रास निरोप दिला

Leave A Reply

Your email address will not be published.