Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी

बुलढाणा (सिंदखेड राजा ) – पक्षाचे प्रांताध्यक्ष मा.ना.श्री. जयंतराव पाटील साहेब यांनी “एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी” हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.दर महिन्याच्या पहिल्या शनीवारी ही बैठक घ्यायची व त्यासंबंधीचे एक सविस्तर पत्र त्यांनी पाठविले होते

KAZI SAHEB
KAZI SAHEB

त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्या सूचनेनुसार ५/२/२०२२ रोजी महिन्याचा १ ला शनिवार ला संत सावता महाराज सभागृह नगर परिषद सिंदखेडराजा या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीमध्ये सदस्य नोंदणी , केंद्रातील अर्थसंकल्प यावर चर्चा करण्यात आली यासोबतच पुरोगामी विचार यावरही चर्चा झाली . या बैठकी मध्ये सिंदखेड राजा येथील रहिवाशी जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी , तालुका अध्यक्ष सतिष काळे , शहराध्यक्ष सीताराम चौधरी यांच्यासह नगरसेवक , पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याच बैठकीत नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले मत, सूचना, समस्या यावरही चर्चा केली .

KAZI SAHEB

जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांनी बैठकीचे उद्धिष्ट सांगतानाच कार्यकर्ते , पदाधिकारी यांनी या बैठकीचे आयोजन स्थानिक पातळीवर करून आपल्या आपल्या गावातील / प्रभागातील बैठकीला हजर राहावे या बैठकीकरिता इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही तसेच नवीन सदस्य नोंदणीकरिता मार्गदर्शन करून सुचना केल्या . या बैठकीमध्ये अमोल भट यांनी पुरोगामी विचार व सोशल मीडियावरील माहिती यावर मार्गदर्शन केले . जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांनी सर्व कार्यकर्त्यांना विचार व्यक्त करण्याची संधी दिली .बैठकीत कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपले विचार प्रगट केले .

Leave A Reply

Your email address will not be published.