कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जा च्या आर्थिक नुसकानास कारणीभुत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत तक्रार दाखल,
गजानन सोनटक्के जळगाव जा
शासनाच्या अन्नधान्य वाहन पावतीचा सेस बुडवून स्वतःचा आर्थिक फायदा करून कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आर्थिक नुसकानाला कारणीभूत असलेल्या कर्मचार्यांची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत अनिल शंकर इंगळे यांच्या कडून जिल्हा निबंधक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय जळगाव जामोद येथे तक्रार

करण्यात आली,,
सदरचे प्रकरण असे की
कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद येथे मुख्य प्रशासक,प्रशासक व सचिव यांच्या संगतमातीने मोठ्या भांडवल व्यापाऱ्यांकडून अन्नधान्य वाहन पावतीचा सेस चुकवून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत आहेत व कर्त्यव्यास कसूर करून आर्थिक नुसकानाला कारणीभूत ठरत कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद चे मोठ्या प्रमाणात नुसकान केले आहे आणि करत राहतील.
कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद अंतर्गत मोठ्या प्रमाणात मालाची आवाक असून अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांचा नियमाप्रमाणे सेस न आकारता काही प्रमाणात सूट देऊन आर्थिक फायदा करून घेत आहेत,सर्रासपणे जो जास्त आर्थिक लाभ प्रशासक यांना करून देतील त्यांचे वाहने विना सेस ची सोडल्या जातात,अश्या कर्त्याव्यास कसूर कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आर्थिक दृष्टिकोनातून न्याय व हितासाठी योग्य आहे.संबधित तक्रार प्रकरणातील सर्व प्रकारचे ऑडिओ क्लिप स्वरूपातील पुरावे माझ्याकडे असून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे,,