Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण सुधारित कार्यक्रमास मुदतवाढ

बुलडाणा दि.४ :  दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये दावे व हरकती स्विकारण्यात येणार होत्या. परंतु सुधारित कार्यक्रमानुसार दिनांक ५ डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

VOTTER LIST

१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी पुनर्निरिक्षण कार्यक्रमातंर्गत दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार असुन सदर अंतिम यादी आगामी नगर परिषद निवडणूक २०२२ व जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक -२०२२ करीता ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी अद्यापही मतदार यादीमध्ये नाव नोंदविलेले नाही, अशा मतदारांनी ५ डिसेंबर  पर्यंत आपले मतदान केद्रांवर मतदान केद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आपले विहित नमुन्यातील अर्ज सादर करुन मतदार यादी मध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  एस.राममूर्ती  यांनी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती गौरी सावंत  यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.