Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

नागझरी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार.

रवींद्र सुरुशे मेहकर – मेहकर चिखली रोडवर नागझरी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण ठार झाल्याची घटना ३०जुलै च्या रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की, मेहकर एसटी डेपो मध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले मृतक जगन्नाथ मारुती देवकर वय ४२,मुक्काम नागझरी तालुका मेहकर हे रात्रीला आपली ड्युटी संपून गाडी क्रमांक एम एच २८ जे ९१४८ मेहकर कडून आपल्या घरी येत असताना हाकेच्या काही अंतरावरच आपल्या घरी पोहोचायच्या अगोदरच अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही माहिती सकाळी तीन वाजताच्या सुमारास रोडवरून जात असलेल्या प्रवाशाने पोलीस हेल्पलाईन १०० या क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली.व त्यानंतर त्यांना गावचे पोलीस पाटील प्रकाश गवई,पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी १०८ एम्बुलेंस ने उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे हलविले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी, व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या एकाकी जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. व त्या अज्ञात वाहनाला शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेचा पुढील तपास मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिस स्टेशनचे श्री धिके साहेब, राठोड साहेब हे करीत आहेस.

Leave A Reply

Your email address will not be published.