Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये अँन्यूअल डे उत्साहात साजरा

देऊळगाव राजा – येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूल चा अँन्यूअल डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाले , यावेळी बोलतांना डॉ शिंगणे यांनी मुलांना मोबाईल फोन व इंटरनेट सुविधा उपलब्ध जरूर करून द्याव्यात परंतु या सुविधेचा वापर मुले करीत असताना पालकांनी त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष सुद्धा देणे आवश्यक आहे.

OXFORD

मुले जरी इंटरनेट सुविधा वापरत असली तरी त्यांचा वयानुसार आवश्यक गोष्टीच मुलांनी त्यावरून घ्यायला हव्यात व यासाठी पालकांचे त्यांच्याकडे बरकाईने लक्ष असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. अँन्यूअल डे च्या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रमुख प्रमोद घोंगे पाटील, इंग्लीश स्कूल असोसिएशन चे भरत भांदर्गे, गजानन कळकुंबे, उत्तमराव घोंगे पाटील, अध्यक्षा प्रिया घोंगे पाटील, माजी सभापती रेणुका बुरकूल तसेच सत्कारमूर्ती आय पी एस अनिल म्हस्के यांचे आई-वडील लक्षिबाई व रामदास म्हस्के,अमरावती विद्यापीठाचे प्राचार्य विजय नागरे, आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर झगरे , बोरकर सर, शरद घोंगे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


अन्यूअल डे च्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नाट्य कलाविष्कार तसेच नृत्य गीते सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतून वर्षभरामध्ये घेतलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्यांना मेडल व ट्रॉफी देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या उप प्राचार्या स्वाती भालेराव, लक्ष्मण खांडेभराड, रिता सुरोसे, वैशाली चेके, आकाश सद्गुले, तन्मया पुजारी, रवी खांडेभराड, पूजा भोपळे, प्रतीक्षा भुरावत, शुभांगी वायाळ, पूजा देशमाने या शिक्षकांनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.