Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सिंदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

सिंदखेड राजा – २७ जून रोजी सिंदखेडराजा विश्रामगृहावर जेष्ठ नेते रमेशदादा कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे,तालुका समन्वयक विनोद प-हाड सर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ कायंदे,जेष्ठ नेते महेशभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.सर्वप्रथम स्व.जगनराव ठाकरे,मा.उपनगराध्यक्ष सिंदखेडराजा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यांनंतर तालुका काँग्रेस कमिटीचा आढावा,निरीक्षक विनोद प-हाड सर यांच्या मार्फत जिल्हाध्यक्षांना देण्यात आला.
त्यानंतर आगामी जि.प. व पं.स. निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली.

RAHUL BONDRE

शासकीय कमिट्यावर नियुक्ती व काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील सरपंच यांचा सत्कार राहुल भाऊ यांनी केला,त्यामध्ये सिद्धार्थ जाधव नवनियुक्त संचालक कृ.उ.बा.समीती, जुनेद अली,नवनियुक्त संचालक खरेदी-विक्री, कौशल्या अशोक पालवे,नवनियुक्त संचालक कृ.उ.बा.समिती, किं.राजा चे सरपंच ज्ञानेश्वर गोविंदराव कायंदे, वसंतनगर सरपंच व नवनियुक्त खरेदी विक्रीचे संचालक सुभाषराव जाधव, सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष नवनियुक्त अशपाक पठाण, कोनाटी सरपंच, परमेश्वर खंदारे तथा कंडारीचे ग्रा.पं.सदस्य शिवाजी खरात यांचा पक्षप्रवेश व सत्कार झाला. पक्षाचे सतत निष्ठेने काम करत असल्याबद्दल सोपानराव खरात,कारभारी खरात,व अन्य कार्यकर्त्यांचा सत्कार राहुलभाऊ यांनी करून समाधान व्यक्त केले.यावेळी तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे,शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव,कार्याध्यक्ष उल्हास भूसारे, दिपक जगनराव ठाकरे,कचरुजी भारस्कर साहेब, सुनील जायभाये,सुभाष कोकाटे, राहुल साबळे,पांडुरंग शिंगणे,गजानन तुपकर, समाधानम काकड,मदन आघाव,कदीर भाई, रहेमान भाई तथा तालुका/शहर कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.