Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून सिंदखेड राजा तक्रार दाखल

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी २४-कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे शिवसेनेच्या वतीने ठाणेदार जयवंत सातव यांना निवेदन दिले तारीख 24 ऑगस्ट रोजी शिवसेना तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे शिवसेना नेते योगेश मस्के यांनी याप्रसंगी कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली तसेच राणे मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या

निवेदनात म्हटले आहे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे आणि हा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही भारतीय जनता पार्टी व मोदी सरकारने तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा व मुख्यमंत्र्यांची माफी मागावी कारण आशा बेताल वक्तव्य आणि विनाकारण सामाजिक तेढ निर्माण होते

याप्रसंगी नगराध्यक्ष सतीश तायडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे युवानेते योगेश मस्के युवासेना उपजिल्हाप्रमुख अतिश तायडे नगरसेवक बालाजी मेहेत्रे नगरसेवक भिवसन ठाकरे नगरसेवक बाळू मस्के माजी पंचायत समिती सभापती विठ्ठल राठोड युवा सेना शहर प्रमुख अक्षय केळकर गणेश खरात शिवा वागले पप्पू आढाव संदीप पवार बालाजी मगर यांच्यासह आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.