
प्रतिनिधी सचिन मांटे
किनगावराजा. जगदगुरु संत तुकोबाराय यांचे सहकारी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि सोहळा किंनगावराजा नगरीत विठ्ठल रुख्मिणी या मंदिरात पार पडला या ठिकानी तेली समाज बांधव यांच्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या पुण्यतिथी व सोहळा प्रसंगी श्री.नाना महाराज पोखरिकर यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करुन किर्तानाच्या माध्यमातून नाना महाराजनी तेली समाजाचे आराध्य असलेल्या संत श्री जगनाडे महाराज यांच्या जिवनाविषयी व केलेल्या कार्याविषयी माहिती दिली .या नंतर सदुंबरे येथून समाज जोडो रथ यात्रा घेवुन निघालेल्या संताजी महाराज यांच्या रथयात्रेचे सर्व समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले, यात कैलास वल्टे यानी रांगोळीतून महाराजांच्या प्रतिमेचे रेखाटन केले होते व शेवटी महाप्रसादचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी स्थानिक श्री संताजी जगनाडे युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते समस्त तेली बांधव व किनगावराजा गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.