Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सिंदखेडराजा तालुक्यात समृद्धी महामार्ग कंपनी ला अवैद्य मुरूम उत्खननचा २१ कोटी ६४ लाख रुपयाचा दंड

सिंदखेड राजा प्रतिनिधी सचिन मांटे – रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कॅम्प तडेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांनी प्रकल्प क्षेत्राच्या बाहेरून उत्खनन केले असल्यामुळे त्यांची कृती शासनाच्या प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई चे आदेश देत त्यांना अवैद्य मुरूम उत्खननचा २१ कोटी ६४ लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला .

SAMRUDDHI MAHAMARG

मौजे साठेगाव हिवरखेड पूर्णा तडेगाव येथील समृद्धी महामार्गावर अवैध मुरमाचे उत्खनन तात्काळ थांबून मोजमाप करण्यासंबंधी तक्रार अर्ज तालुका दंडाधिकारी साहेब तहसील कार्यालय सिंदखेड राजा यांना अर्जदार गणेश हुसे व उमेश हुसे राहणार निमगाव वायाळ यांनी ५ऑगस्ट 2020 रोजी दिला होता . त्या तक्रार अर्जात त्यांनी विनंती केली होती की २०/०२/२०२० रोजी अर्ज कार्यालयाकडे दिल्यापासून संबंधित तक्रारीचे निवारण न करता संबंधित ठेकेदाराच्या पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. तरी संबंधित ठेकेदारांनी मुरूम अवैध उत्खनन याठिकाणी कुठलाही फलक व वाहतूक करत असताना कोणत्याही पावती न वापरता खुलेआम हजारो ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन करून नोंदवहीमध्ये नोंद नाही .

व वाहतुकीदरम्यान खनिज साठवू नये किंवा त्याची धूळ उडू नये यासाठी ट्रक ताडपत्री नाही किंवा योग्य अशा सहाय्याने झाकून वाहतूक होत नाही व ध्वनी प्रदूषण व धूळ प्रदूषणाची कोणती उपाययोजना वापरण्यात आल्या नाही . मुरमाचे खोदकाम एक सारखे नाही संबंधित ठेकेदार यांनी अटी व शर्तीचा भंग केल्याचे दिसून येत आहे तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते व संबंधित ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग ,प्रधानमंत्री सडक योजना ,जिल्हा परिषद बांधकाम विभागात अंतर्गत रस्ते खराब केल्याचे दिसून येते व गौण खनिज उत्खननाचा परिणाम बाबत वेळोवेळी तपासणी अहवाल सत्यप्रती तक्रार करण्यात याव्यात तरी खनिजांची ठेकेदार कडून व आपल्या महसूल विभागाकडून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व ठेकेदारास सूट देण्यात येत आहे तरी अवैध खनिज उत्खनन तक्रार तात्काळ थांबून संबंधित ठेकेदारावर कारवाईची अपेक्षा आहे अशा प्रकारचा तक्रार अर्ज देण्यात आला होता.

सदर तक्रार अर्जाची दखल घेऊन सुनील सावंत तहसीलदार सिंदखेड राजा यांचे कार्यालय सिंदखेड राजा तर्फे आदेश देण्यात आला की समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मौजे विजोरा येथील गट नंबर 395 ,394 ,341, 404 ,340 मधून मोठ्या प्रमाणामध्ये मुरमाचे उत्खनन झालेले आहे . संबंधित व्यवस्थापक यांनी सादर केलेल्या पुरवण्यांमध्ये विजोरा येथील कोणताही गट समाविष्ट नसल्याने सदर उत्खनन हे अवैधरित्या केल्याचे दिसून येते परंतु सदर गटाचे प्रत्यक्षात किती उत्खनन झाले हे समजण्यासाठी तांत्रिक मोजमाप करणे आवश्यक आहे मलकापूर पांग्रा येथील गट नंबर 1 मधील पाझर तलाव क्रमांक दोन मौजे हिवरखेड पूर्णा येथील खाजगी गट नंबर 182 मौजे मलकापूर पांग्रा येथील गट नंबर 292 मध्ये उत्खनन परवाना असल्याचे नमूद असून त्याचे मोजमाप करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे व मौजे विजय येथील मुरूम उत्खनन परवाना नसलेले गट नंबर तीनशे 95 ,394 ,341 ,404 व 340 मधील अवैधरित्या झालेले मुरूम उत्खनन समजण्यासाठी संबंधित क्षेत्राचे तांत्रिक मोजमाप करणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे हा आदेश २२/०/२०२२ रोजी पारित करण्यात आला.

या आदेशानुसार मौजे विझोरा तालुका सिंदखेड राजा येथील गट नंबर 238 ,239 ,442 ,395 ,394 ,341 उत्खनन केलेले ब्रास व प्रकार 38 ,99 ,42 ,16 मुरूम याचे बाजार मूल्य 4950 प्रति ब्रास ,गौण खनिज स्वामित्व धनाची प्रति ब्रास रक्कम ६०० ,गौण खनिज स्वामित्वधन ची मूळ रक्कम 233 9652 9.6, पाचपट दंडाची रक्कम 19 32 13 69 , अशी होणारी दंडाची एकूण रक्कम २१ कोटी ६४ लाख रुपयाचा दंड .

Leave A Reply

Your email address will not be published.