Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पिक विम्यासंदर्भात मा.मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांनी साधला संवाद

गजानन।सोनटक्के जळगाव जा – मतदार संघातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याकरीता मी सक्षम आहे. सुरु असलेले हे आरोप बिनबुडाचे आहे. तरी ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांनी नाव घेवून करा. जळगाव जामोद मतदार संघामध्ये प्रसिध्दीच्या हव्यासापोटी झालेला अतिउतावीळपणा बाळगुन बिनबुडाचे आरोप करण्याचे षडयंत्र सुरु असल्याने शेतकर्‍यांच्या पिक विमाबाबतची भुमिका जळगांव जामोद मतदार संघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी आपले मत मांडले.

SANJAY KUTE

भारतीय जनता पार्टीच्या शासन काळात 5 वर्षामध्ये शेतकरी बांधवांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या काळात योग्य न्याय देण्याची भुमिका घेतली. सन 2015-16 काळात राज्यातील शेतकर्‍यांना 4 हजार 28 कोटी पिक विमा जमा करण्यात आला तर सन 2016-17 या काळात 1924 कोटी पिक विमा शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला तर सन 2017-18 च्या काळात 4 हजार 655 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले. सन 2019-20 या काळात 5 हजार 551 कोटी असे एकुण 14 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले या पाच वर्षाच्या काळात शेतकर्‍यांनी पिकविम्याकरीता 2 हजार कोटी रुपये भरले असुन शेतकर्‍यांना 14 हजार कोटी देण्यात आले आहे.

मात्र सन 2020-21 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले असून हया वर्षात शेतकर्‍यांनी पिकविम्याकरीता 900 कोटी जमा केले असले तरी शेतकर्‍यांना पिक विमा 823 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तरी महाविकास आघाडीने शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याकरीता पुढाकार घेणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकार उठसुठ केंद्र शासनावर बोट ठेवून असते. राज्य शासनाचा दुर्लक्षपणा हा शेतकर्‍यांना डोकेदुखीचा ठरत आहे. तरी शेतकर्‍याच्या हितासाठी भाजपा सरकार सतर्क होते. त्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने सुध्दा शेतकर्‍यांच्या हक्काचा पैसा द्या. हयाबाबत कृषी मंत्र्याकडे मागणी करणार आहे. न्याय दिला नाही तर भांडावे लागेल. हयाबाबत कृषि सचिव यांची सुध्दा भेट घेतली आहे.

शेतकर्‍यांकरीता मी सदैव लढा देत असतो. तरी होणारे आरोप हे बिनबुडाचे आहे. तरी ज्यांनी आरोप केले आहेत. त्यांनी नाव घेवून करा. मतदार संघातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याकरीता मी सक्षम आहे. शेतकर्‍यांच्या पिक विम्याबाबत कृषी विभागाशी मी संपर्क साधत आहे. मागणी करीत आहे. जर शेतकर्‍यांना न्याय दिला नाही तर आंदोलनही करेल. तरी माझे सेवेचे व्रत मी अंगिकारले आहे. तरी माझ्या घरासमोर आंदोलन करण्यापेक्षा कार्यरत पालकमंत्र्यापुढे ठिय्या मांडावा. मी शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी सक्षम आहे. तसेच मतदार संघातील कार्यकर्त्यांनी संयम पाळावा. बिन बुडाचे आरोप हे होत असतात हयाबाबत मी संयम बाळगुन आहे. तरी कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असे ही सुचित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.