Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आगामी निवडणुकीत स्वराज्य संस्थेवर पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा – खा प्रतापराव जाधव

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] – शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिव संपर्क मोहीमेला सुरवात झाली असुन गाव तेथे शिवसेनेची शाखा स्वर्गीय बाळासाहेबांचे आचार विचार पक्षाचे ध्येय धोरण पक्षाचे कार्य जसे २० टक्के राजकारण ८० टक्के समाज कारण प्रमाणे घरा घरात पोहचने हा या मागचा उद्देश असुन येणाऱ्या जि प पं स स्वराज्य संस्था निवडणुकी डोळ्या समोर ठेऊन पक्ष संघटन मजबुत करण्यावर भर देऊन शिवसेना पक्षाचे उमेदवार निवणुन आणण्यासाठी कामाला लागा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करा असे आव्हाण खासदार प्रतापराव जाधव यांनी शिव संपर्क मोहिम अंतर्गत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी प्रसंगी व्यक्त केले

shivsena

तालुक्यात शिवसंपर्क अभियान खा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनात राबविण्यात आले खा प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यात ३५ शिवसैनिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे पाटील सहसंपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील शिवसेना ऊपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे संग्रामपुर शिवसेना ता प्रमुख रविन्द्र झाडोकार शिवसेना , तालुकाप्रमुख शेगाव ऊमेश पाटील तालुका प्रमुख जगन्नाथ मिसाळ प स सदस्य डाॕ श्रीराम दाभाडे प स मा ऊप सभापती नंदु विश्वकर्मा विभाग प्रमुख रमेश चिपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपुर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय संग्रामपुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली
यावेळी शांताराम दाणे, दता पाटील , तुकाराम काळपांडे , रविन्द्र झाडोकार यांची समायोचित भाषणे झालीत प्रास्ताविक मधुन शिवसेना ता प्र रविन्द्र झाडोकार शिव संपर्क अभियान राबविण्या मागचा उद्देश पक्ष संघटन, गाव निहाय शिवसेना पक्षाची स्थापना , नविन मतदार नोंदणी आगामी जि प पं स ग्रा प मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडुन आणणे ध्येय धोरण महत्व विषद केले


यावेळी खा प्रतापराव जाधव यांच्या उपस्थित आसिब शहा , देवा घाटे , दिपक बोदडे , मनोज बोदोडे , मंगेश नांदणे , रामेश्वर बोदोडे , मंगेश साटोडे , रामेश्वर बोदोडे , गोविंदा बोदोडे , गणेश गिरी , अमोल झापर्डे , जुबेर शाह , धनसिंग ठाकुर , शेख आसिफ , महादेव सावीकर , कुणाल देशमुख , विजय धरमकार गजानन वानखडे यांच्या सह ३५ नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला प्रवेश कर्त्याचा खा जाधव यांच्या हस्ते गुल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते

     आलेवाडीत शिवसेना पक्षाची शाखा स्थापना आदिवासी मुसलीम युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसंपर्क अभियाना अंतर्गत मुसलीम बहुल असलेल्या आलेवाडी गावात शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र झाडोकार यांच्या नेतृत्वात प्रथमच मुसलीम बहुल आदिवासी भाग असलेल्या आलेवाडी गावात शिवसेना शाखेचे थाटात उदघाटन यावेळी अफसर सुरत्ने यांची शाखा प्रमुख नियुक्ती करण्यात आली तर ३० आदिवासी मुसलीम युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला नवनिर्वाचीत शाखा प्रमुख अफसर सुरत्ने सह प्रवेश कर्त्याचा शाल श्रीफळ पक्षाचा रुमाल देऊन सत्कार करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.