बुलडाणा, दि.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कर्यालयात अनुसूचित जाती उपयोजनेची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी एकल खिडकी निर्माण करण्यात येणार आहे.

सदर कार्यालयातंर्गत अनुसूचित जाती उपयोजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील 14 यंत्रणांना विविध उपयोजना राबविण्यातकरीता यंत्रणेच्या मागणीच्या प्रमाणात नोंदविण्यात आलेल्या अर्थसंकल्पीत निधी वितरित करण्यात येत असतो. तथापि संबंधित सर्व यंत्रणांकडील योजना त्यांच्या स्तरावरच राबविण्यात येत असतात. त्याकरिता जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या घटकांना प्रत्येक कार्यालयात योजनांची माहिती व मार्गदर्शन घेण्यासाठी वणवण भटकंती होवू नये, या दृष्टीने समाज कल्याण कार्यालयातंर्गत एकल खिडकी निर्माण करण्यात येणार आहे, असे सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी कळविले आहे