Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अनलॉक मग आठवडी बाजार केव्हा होणार सुरू? ग्रामीण भागाची गरज

[09:30, 6/20/2021] Amol Bhat: अनलॉक मग आठवडी बाजार केव्हा होणार सुरू? ग्रामीण भागाची गरज

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

कोरोना महामारीला आटोक्यात आणण्याकरिता संसर्ग साखळी खंडित करून रुग्ण संख्या कमी करण्या साठी शासन-प्रशासणाने अनेक उपाय योजना केल्या. संसर्ग वाढतच गेल्याने अखेर महाराष्ट्र राज्यात सलग दोन वेळा लॉकडाऊन घोषित केला त्यामध्ये संपूर्ण बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, कार्यालय, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाली होती.

Weekly market

14 जून ला मात्र शासनाने लॉकडाऊन उठवून अनलॉक ची घोषणा काही अटी नियम घालीत अघोषित संचारबंदी उठवली. त्यामध्ये अतिमहत्त्वाच्या सोईसह बाजारपेठा, भाजीमार्केट, इतरही सर्व प्रकारचे प्रतिष्ठाने पूर्ववत सुरू झाल्याने रस्त्यावर पुन्हा रेलचेल सुरू झाली. परंतु खेड्या गावातील व्यवहार प्रामुख्याने ज्या आठवडी बाजारातशी निगडित आहे आठवडी बाजार अर्थात खेडेगावाची आर्थिक नाडीच असून मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी या सगळ्यांची आर्थिक नियोजन म्हणजे आठवडी बाजार! अनलॉक मग आठवडी बाजारे केव्हा होणार सुरु? हा सामान्य जनतेचा प्रश्न खरतर प्रशासनाला आहे. ग्रामीण भाग व आठवडी बाजार हे एक शेतकरी, शेतमजुरांच समीकरण आहे. सातपुडा पर्वताचे पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये पूर्णतः मजुरांची संख्या जास्त आहे आठवडी बाजारातून एकाच वेळ दिवसासाठी जीवनाश्यक वस्तू खरेदी करायच्या व त्यावरच पूर्ण आठवडा काढायचा असा या लोकांचा नित्यक्रम आहे म्हणूनच ग्रामीण भागातील बाजार गजबजून खचाखच भरतात तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अशाच बाजारातून मोठ्या प्रमाणात होत असते बाजारच बंद असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला विकावा तरी कुठे असा सवाल विचारला जात आहे ्हणून जिल्हाधिकार्‍यांनी गंभीरतेने दखल घेऊन आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी व शेतमजूर करत आहे बाजार बंद असल्याने त्यांच्या गावातील ग्रामपंचायत च्या आर्थिक नुकसान होत आहे कारण बाजार हराशीतून ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात कर मिळतो हाच पैसा ग्रामपंचायत विकास कामांवर खर्च करत असते म्हणून बाजार सुरू करा अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे म्हणून खूप शासनाने आठवडी बाजार संबंधी सुद्धा आपले धोरण लवकरात लवकर जाहीर करून सामान्य जनतेच्या मनातील संवेदना ओळखाव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.