जालना येथिल खुनाच्या तपासात ४ संशयीत अटकेत. सुर्यकांत रंगनाथ रत्नपारखेचा शोध कधी ? कि त्या व्यक्तीच्याही जिविताचे काही झालेय ? वैद्यकीय व्यावसायीकाची जालना , टेंभुर्णी पोलिसात तक्रार
जालना – जालना पोलिसांनी अक्षय पाटोळे या युवकाच्या खून प्रकरणी चार संशयतांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील पेन्शनपुरा भागातील एका घरातून अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. प्राप्त माहितीनुसार काही वर्षापासून शहरातील गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे . त्यातही शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे पकडण्यात आल्याने एकूण किती गावठी कट्टे पकडण्यात आले ? कोणी आणले ? कोणाला विकले ? केवढ्याला विकले ? विक्रीसाठी कुठून आणले होते ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कमी अधिक प्रमाणात असेच काही प्राण घातक शस्त्रे, तलवारी, खंजीर, चोपर, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या आठवड्यात औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी जालन्याला खास भेट देत जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी काही नागरिकांनी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
दरम्यान जाफराबाद तालुक्यातील सावरगाव म्हस्के येथील एका जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या प्रकरणात सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकाने तर जमीन खरेदी प्रकरणाच्या अनुषंगाने अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केलेल्या होत्या. भोकरदनच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध त्या वैद्यकीय व्यावसायिकांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करतानाच; त्यांनी खरेदी केलेल्या सावरगाव म्हस्के येथील जमिनीच्या मूळ मालकांनीच बनावट कागदपत्रे आणि बंधपत्राच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी संगणमत करून वैद्यकीय व्यवसायिकांनी ज्यांच्याकडून जमीन विकत घेतली होती त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केल्या विषयाचे कागदोपत्री पुरावे सादर केले होते.
या सर्व प्रकरणात त्या वैद्यकीय व्यवसायिकांनी जालन्यातील प्रभावी सत्याधारी नेत्यांची नावे घेत ता. 20 जून 2023 ला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला होता. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी त्या वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या तक्रारीनुसार तातडीने कारवाई करण्याविषयीचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची सूचना केली होती. या सर्व प्रकाराला आठवडाभरापेक्षा अधिकचा काळ लोटला आहे या बनावट बंधपत्र आणि खोटे गुन्हे प्रकरणात गंभीर तक्रार झालेले भोकरदन चे उपविभागीय पोलीस अधिकारी दोन-तीन दिवसात सेवानिवृत्त होत आहेत आणि या पोलिस अधिकारी यांची संपूर्ण प्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक करीत आहेत.
सावरगाव म्हस्के येथील जमीन खरेदी विक्री आणि बनावट कागदपत्रांवरून दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यासारख्या गंभीर स्वरूपाचे असताना आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते अधिकारी सेवानवृत्त होत असताना चौकशीचा वेग मंदावत असल्याचा सूर वैद्यकीय व्यावसायिकाचा आहे. जालना जिल्ह्याच्या दोषसिद्धी दरात वाढ करण्याच्या तयारीत पोलीस प्रशासन प्रयत्नशील असताना परवाच्या खून प्रकरणातील चार संशयित ताब्यात घेणे अवैद्य शस्त्र पकडणे ही निश्चितच चांगली आणि वेगवान सुरुवात आहे. तथापि सावरगाव म्हस्के येथील जमीन गैरव्यवहार आणि बनावट कागदपत्रांच्या गुन्ह्याचे प्रकरण तेवढेच गंभीर आणि महत्त्वाचे आहे त्याचा तातडीने छडा लागणे अगत्याचे आहे.
सिंदखेडराजा येथील या वैद्यकीय व्यावसायिकाने टेंभुर्णी पोलीस स्टेशन तालुका जाफराबाद येथे फिर्याद दिलेली आहे की टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे ७६/२३ या गुन्ह्यामध्ये जो स्टॅम्प पेपर वापरण्यात आलेला आहे त्या स्टॅम्प पेपरचा मूळ खरेदी करता सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे हा व्यक्ती कुठेही आढळून येत नाही व त्या व्यक्तीचे काय झाले ? याचा शोध घेण्यात यावा कारण या वैद्यकीय व्यावसायिकाने जालना येथे पत्रकार परिषद घेऊन सदर व्यक्तीच्या नावे असलेला मूळ स्टॅम्प पेपर सावरगाव म्हस्के येथील गणेश कुंडलिक मस्के यांनी व सुनील गणेश मस्के यांनी वापर केलेला असल्याचे दिसून येते सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे या व्यक्तीच्या नावासह प्रसार माध्यमांना बातम्याप्रसाद झाल्यानंतरही कुठेही सदर व्यक्तीसमोर आलेले नाही .
त्यामुळे या व्यक्तीच्या अनुषंगाने या वैद्यकीय व्यवसायिकाने शंका व्यक्त केलेली आहे व या सावरगाव म्हस्के येथील व्यक्तींनी सदर स्टॅम्प पेपर सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखी या व्यक्तीच्या काही बरे वाईट करून तर आणलेला नाही ना ? किंवा सदर व्यक्तीकडून अतिरिक्त पैसे देऊन बेकायदेशीर मार्गाने तर स्टॕम्प पेपर तर आणलेला नाही ना ? या विषयाची शंका व्यक्त केलेली आहे. त्या अनुषंगाने या वैद्यकीय व्यवसायिकाला पोलीस स्टेशन टेंभुर्णी येथून जबाब नोंदवण्यासाठी नोटीस सुद्धा आलेली आहे व त्यांनी त्या ठिकाणी जबाब सुद्धा नोंदविलेला आहे तरी जालना पोलीस प्रशासनाने या संशयित विषयावरही तातडीने चौकशी करून सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे या व्यक्तीचा शोध घेऊन बनावट स्टॕम्प पेपर पोलिस स्टेशन व इतर शासकीय कार्यालयाला वापरल्या प्रकरणी गुन्हे दाखल करुन ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे अशा तपासाप्रमाणे तातडीने कारवाई करणे सुद्धा अगत्याचे आहे.