Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

साहेबांचा आदर्श घेणार की फक्त समाजाचा मतांसाठी वापर करणार….?

चिखली राजीव जावळे चुकीला चुक म्हणता आलं पाहिजेत, समाजाच्या कुठल्याही घटकावर अन्याय झाला तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हिम्मत दाखवता आली पाहिजे हाच आदर्श पुन्हा एकदा आदरणीय आ डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेबांनी दाखवून दिला आहे.

लोकप्रतिनिधींना स्वाभिमानाने समाजासमोर जाता आलं पाहिजेत.
पदांसाठी… सत्तेसाठी…. स्वार्थासाठी आपला स्वाभिमान गहाण टाकून ज्या समाज घटकांचे आपण देणे लागतो त्या समाज घटकांचा विसर पडलेल्या व केवळ आपल्या नेत्यांच्या समोर चमकोगीरी करण्यासाठी जालन्याच्या लाठीचार्ज चा साधा निषेध ही नकरता शासन आपल्या दारी ला गेलेल्या लोकप्रतिनिधींना जबरदस्त चपराक मारत आदरणीय शिंगणे साहेबांनी पुन्हा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

काल जालना येथील शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांधवांवर, माता भगिनींवर गृह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीसांनी भ्याड हल्ला, लाठीचार्ज केल्याने समाजमन अतिशय निराश झाले आहे. याच समाज भावनेचा विचार करून संवेदनशील नेतृत्वाने सरकार आपल्या दारी या जाहिराती साठी आणि केवळ चमकोगीरी साठी असलेल्या कार्यक्रमाला पक्षाची सर्व बंधने झुगारून उपस्थित न राहता लाठीचार्ज विरोधात असलेल्या निषेध मोर्चा मध्ये सहभाग नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.