Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

फोटोसेशन बेतले जीवावर एकाला जलसमाधी…

मेहकर – मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील पर्यटन स्थळावर आपल्या मित्रांसह गेलेला रोशन मुरारी इंगळे ( रा . भानखेड , ता . चिखली ) हा युवक त्या तलावामध्ये बुडून मरण पावला. आहे ही घटना दि. २२ जून रोजी घडली. या युवकावर काळाने घातलेल्या घाल्यामुळे भानखेड या राहत्या गावावर शोक कळा पसरली आहे.


मेहकर तालुक्यातील विवेकानंद स्मारकावर दिनांक 22 जून रोजी दुपारी दोन वाजता लक्ष्मण गजानन इंगळे,वय 22 वर्ष, आदेश किशोर इंगळे, 21वर्ष,ऋतिक भारत सोनूने वय वर्षे 23,अनिकेत गणेश सुरडकर वय वर्ष 24, रोशन मुरारी इंगळे वय वर्ष 20, सर्व राहणार भानखेड ता. चिखली जिल्हा बुलढाणा येथील युवक विवेकानंद स्मारकावर परिसर पाहण्यासाठी आले असता. नौका विहार करताना नावे मध्ये फोटोसेशन करत होते .

फोटोसेशन करतांना त्यातील रोशन मुरारी इंगळे, वय वर्ष 20 राहणार भानखेड,व आदेश किशोर इंगळे वय वर्ष 21या दोन तरुणांनी स्मारक बेटाकडून हिवरा आश्रम बेटाकडे नौका येत असताना बेटाच्या मागे 50 फूट अंतरावर नौका चालू असताना नौका चालक खराटे यांचे काही न ऐकता चालू नावेतून उड्या टाकल्या. त्यावेळी आदेश इंगळे या युवकाला वाचवण्यात नौका चालक गुलाब कांबळे यांनी प्रयत्न करून त्यांना वाचवले. परंतु रोशन इंगळे हा तरूण पाण्यात बुडाला.


या युवकांनी चालू नावेतून उड्या टाकल्या ही फक्तफोटोसेशन साठी स्टंटबाजी असे स्थानिक लोकांकडून प्रत्यक्ष दर्शनी बोलल्या जात आहे.या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच तात्काळ साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रशासनाने मेहकर तहसील तहसीलदार यांनी शोध मोहीम सुरू केली,परंतु दोन ते तीन तास शोध घेऊन सुद्धा रोशन इंगळे यांचा मृतदेह मिळून आला नाही. सायंकाळ झाल्यामुळे संबंधित प्रशासनाने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.रोशन इंगळे यांचा मृतदेह कधी बाहेर काढणार याबद्दल प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.