Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर अपघातात बस पेटली 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू…..

सिंदखेड राजा – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी विदर्भ एक्सप्रेस बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.


या अपघातात ७ जखमी झाले आहेत त्यातील तिघांची चिंताजनक परिस्थिती आहे . ही आग खुप भीषण होती. या आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली.


ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री 1 ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्यातील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि बघता बघता आगीने भीषण रूप धारण केलं. बस पलटी झाल्याने आतील प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडत होते.

किंचाळ्या, आक्रोश सुरू होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे या बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करत होते.यातील प्रवासी नागपुर , वर्धा व यवतमाळ येथुन बसल्याची माहिती आहे .

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर बस आदळल्याने ही बस पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. या भीषण आगीत बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार गाडीमध्ये 29 प्रवासी व ट्रॅव्हलचे तीन कर्मचारी होते. पैकी सात ते आठ प्रवासी बाहेर पडले असून 25 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत .सदर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस, आरोग्य व महसूल सह इतर शासकीय यंत्रणा उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे. प्रवाशांची नावे मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.हा बस अपघात अत्यंत भीषण होता. हा अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळखही पटणं कठीण झालं आहे . बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.