बुलडाणा 7 जुलै – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते पदी विनोद वाघ यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.गेली अनेक वर्षे आपण पक्षसंघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आगामी काळात आपण आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडीचे श्रेय त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेता महाले व पदाधिकार्यांना दिले आहे.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/07/VINOD-WAJH-BJP.jpg)