मुख्यमंत्री यांच्याकडे विधानसभेच्या जागा वाढविण्याबाबत व विधान परीषदेची फेररचना करण्याबाबत मागणी – अरुण चांडक
शेगाव – शेगाव येथील माजी नगरसेवक अरुण चांडक यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेच्या जागा वाढविण्याबाबत व विधान परीषदेची फेररचना करण्याबाबत मागणी केली आहे . राज्य शासनाने ग्रामपंचायत पासुन, जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगर पालीका मधील लोकप्रतिनीधीच्या जागा जवळपास १० ते १५ टक्केनी वाढ केली आहे. वाढलेल्या लोकसंखेच्या प्रमाणानुसार आवश्यक व निगडीची होती. वाढलेल्या संख्ये नुसार वरील संस्थेच्या नविन निवडणुका सुध्दा होत आहे.
वरील सर्व निवडनणुका झाल्यावर विधान सभेच्या निवडणुका सुध्दा लवकरच होणार आहे. विधानसभेच्या जागा सुध्दा वाढविणे गरजेचे आहे. लोकप्रतिनीधी कडुन जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. मतदार संधाची वाढलेली लोकसंख्या पाहता. आमदारास मतदार संघात लक्ष देणे अडचणीचे झाले आहे. तर कित्तेक मतदार संघात आमदार दाखवा व बक्षीस मिळवा असे सुध्दा फलक लावण्यात येत आहे. निवडणुका फार मोठ्या प्रमात खर्चीक सुध्दा झाल्या आहे.
तरी आपणास विनंती की, ज्या प्रमाणेस्थानीय स्वराज्य संस्थामधुन लोकप्रतिनीधीची वाढविलेली संख्या प्रमाणे विधानसभेच्या सुध्दा आपण जागा वाढवीने जरूरीचे आहे. तसेच..विधान परीषदेची फेर रचना आवश्यक. राज्याचे शासनाचे कामकाज दोन सभागृहातून चालते एक विधानसभा व दुसरे विधान परीषद. विधान परिषद स्थापन करण्याचा उद्देश शासनकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे हा असावा. या करीता समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तीची त्यात निवड होत होती. पण आता ह्या जागा संपुर्ण राजकीय झालेल्या आहे. त्यामुळे यात निवडुन येण्याकरीता विधान सभेच्या आमदारास निवडुन येणाऱ्या खर्चा पेक्षा अधिक खर्च करावा लागतो. त्यामुळे खरे विचारवंत दुर जात आहे किंवा गेले आहे.
विधानपरिषदेतील काही जागेची फेररचना व्हावी, जसे स्वराज्य संस्थेमधुन, आमदारा मधुन, शिक्षक मतदार संघातून, राज्यपाल नियुक्त, ह्या सर्व जागा रद्द करून जनते मधुन निवडणुकी व्दारे प्रतिनिधी निवडल्या गेले पाहीजे किंवा अस्या नियुक्ती करतांना पाठविण्यात येणाऱ्या प्रतिनीधी नियुक्ती करण्यापुर्वी ५ वर्षे तरी तो कोणताच राजकीय पक्षाचा सभासद, पाधीकारी, आधाडी प्रमुख नसावा. असेतरी असावयास पाहीजे.अश्या प्रकारची मागणी अरूण चांडक,माजी नगर सेवक, शेगांव न.प., जि. बुलडाणा यांनी पत्राद्वारे केली आहे .